Weather update : महाराष्ट्रात आणखी एक मोठे अस्मानी संकट हवामान विभागाकडून हायअलर्ट जारी

Weather update : यावर्षी महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे, मात्र अजूनही राज्यातील अवकाळी पावसाचं संकट टळलेलं नाहीये. हवामान विभागाकडून (IMD) पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या इशाराऱ्यानुसार पुढील 24 तासांत राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लीक करा

दरम्यान केवळ नुसता पाऊसच पडणार नाही तर वादळी वाऱ्याचा इशारा देखील याकाळात हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या काळात तासी 30 ते 40 किमी वेगानं वारे वाहू शकतात असं हवामान विभागानं म्हटलं आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यास त्याचा मोठा फटका हा फळबागांना बसण्याची शक्यता आहे. पुण्यात देखील हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, पुण्याला हवामान विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे पुणेकरांना वाढत्या उष्णतेपासून दिलासा मिळू शकतो.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लीक करा

दुसरीकडे पाऊस आणि वादळी वाऱ्यासह उष्णतेच्या लाटेचं देखील संकट राज्यावर आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात उष्णतेची लाट आल्याचं पाहायला मिळत आहे. हवामान विभागाकडून आज ठाणे, पालघर, नाशिकसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. वाशिममध्ये राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे, वाशिमध्ये पार 43 अंश सेल्सिअरवर पोहोचला आहे, त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

दरम्यान दुसरीकडे मुंबई आणि उपनगरांबाबत बोलायचं झाल्यास आजही शहरात हवामान कोरडं असणार आहे. मुंबई आणि उपनगरात आकाश निरभ्र राहिलं असं हवामान विभागानं म्हटलं आहे Weather update.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लीक करा

Leave a Comment